Thursday, November 15, 2012

modern article

नाव असावे तुझे कदाचित
लिहिणे होते औरच काही
लिहिता लिहिता वाहून गेलो
नाव असावे तुझे कदाचित,
नकळत जे मी लिहून गेलो..

ना आठवता स्मरले सारे
नयनी आजही खारे वारे
का वाटावे उगीच मजला
की मी तुलाच विसरून गेलो ?
नाव असावे तुझे कदाचित,
नकळत जे मी लिहून गेलो..

कागद कोरा, शहारले तन
त्यावर उडले शिंतोडे मन
गतकाळातील गोरेसे क्षण
शाईसोबत पसरून गेलो
नाव असावे तुझे कदाचित,
नकळत जे मी लिहून गेलो.

सोडून गेलीस ज्या वळणावर
अजुन माझा तिथेच वावर
निघून गेलीस कधी, कुठे तू?
अन मी तिथेच वसून गेलो,
नाव असावे तुझे कदाचित,
नकळत जे मी लिहून गेलो.

No comments:

Post a Comment