स्वत:बरोबर कसं राहतात आनंदानं.?
तिला छोटा भाऊ झाला तो दिवस.
ती ७ वर्षांचीच होती.
त्या इवल्याशा बाळाला हातात घेऊन ‘ती’ आईशेजारी बसली होती.
मग आईबाबांना म्हणाली, ‘तुम्ही जरा बाहेर जा मला या बाळाशी काही बोलायचंय.!’
आई-बाबा घाबरतात. त्यांना कळत नाही की, एवढय़ाशी बाळाशी ही काय बोलणार.? त्याला मारणार तर नाही आपल्यात वाटेकरी आला म्हणून.!
ते काही जात नाही; पण ‘ती’ काही ऐकायला तयार होत नाही. खूप हट्ट करते आणि शेवटी आई-बाबा बाहेर जातात. दार लावून काचेआडून पाहतात की ती नक्की करते काय.
ती त्या छोट्या बाळाला जवळ घेते आणि त्याला हळूच म्हणते, ‘बाळा आत्ताच आलास ना तू देवाघरून. मला प्लीज सांग ना, देवबाप्पाला नक्की काय आवडतं. काय करायचं म्हणून त्यानं मला पृथ्वीवर पाठवलं.? तुला माझ्यासोबतीला पाठवलं.? या सगळ्या मोठय़ा माणसांबरोबर राहून मी विसरून चाललेय रे की, मस्त आनंदानं राहत स्वत:शीच कसं हसायचं.? कसं आनंदानं नाचायचं.? आता तू आला आहेस तर प्लीज सांग. कसं हसायचं मनापासून.!’

No comments:
Post a Comment